Pradeep Pendhare
विधानसभेसाठी राज्यात बुधवारी (ता. 20) मतदान होणार असतानाच, उमेदवार अन् त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांची रंजक माहिती पुढे आली आहे.
भाजपकडे सर्वाधिक 68 टक्के उमेदवार विविध गुन्हे दाखल असलेले दिले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 66 टक्के, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 64 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने 61 टक्के, काँग्रेसने 58 टक्के, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 54 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
4 हजार उमेदवारांपैकी तब्बल 19 टक्के उमेदवारांविरोधात बलात्कार, महिलांवरील अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न, अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
निवडणुकीत 202 महिला उमेदवार असून त्यातील 48 महिला उमेदवारांकडे साधे पॅनकार्ड नाही.
47 टक्के उमेदवारांचे शिक्षण जेमतेम 12वी पर्यंत झालेले आहे. 47टक्के उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात एकूण उमेदवारांपैकी 10 उमेदवार अशिक्षित आहेत.