अनुराधा धावडे
भारताचे सरन्यायाधीश सीजेआय धनंजय चंद्रचुड अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात.
आता ते त्यांच्या चहावरील प्रेमामुळे चर्चेत आले आहेत.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या चहावरील प्रेमाचे अनेक किस्से सांगितले आहेत.
संध्याकाळचे चार वाजताच सीजेआय चंद्रचूड यांना चहाची तीव्र तल्लफ जाणवते.
मुंबई उच्च न्यायालयात वकीली करताना न्यायालयाच्या बाजूला असलेल्या कॅन्टिनमध्ये बसुन चहा प्यायचे
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्यानंतर ते कॅन्टिनमध्ये बसुन चहा पिऊ शकत नव्हते.
पण माझ्या केबिनच्या शेजारीच असलेल्या कॅन्टिनमधून चहाचा सुगंध यायचा. ते केबिनमध्ये बसुनच चहा प्यायचे.
चहासाठी त्यांनी एकदा वरिष्ठ वकिलांना मध्येच थांबवत, तुम्ही संध्याकाळचे चार वाजता एक कप चहाविना कसे राहु शकता. मला चहा प्यायचा आहे आणि तोच मला संपूर्ण दिवसभर ऊर्जा देतो. असं म्हटलं होतं
चहासाठी एकदा सीजेआय चंद्रचूड यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि पराग पी त्रिपाठी यांना युक्तीवाद करताना मध्येच थांबवलं होतं.