Rashmi Mane
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील निवासस्थानी गौरीच्या आगमनाच्या दुसर्या दिवशी गौरी-गणपती पूजन करण्यात आले.
अत्यंत आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात गौरी पूजन पार पडले.
दरवर्षी हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गौरी-गणपती हा सण पार पडतो.
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
गौरी-गणपतीसाठी अतिशय आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.
हर्षवर्धन पाटील व त्यांची पत्नी भाग्यश्री पाटील यांनी गौराईची विधिवत पूजा केली.
सर्वांना सुखी ठेव, बळीराजास सुखी ठेव तसेच सर्वांचे जीवन सुजलाम् सुफलाम् होऊ दे अशी प्रार्थना केली.