सरकारनामा ब्युरो
ऑस्ट्रेलियाने उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील 5 राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठी व्हिसा बंदी घातली आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.
व्हिसा कागदपत्रांमध्ये फसवणूक केल्याचा आणि स्टडी व्हिसावर पूर्णवेळ काम करत असल्याचा या विद्यार्थ्यांवर आरोप आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अमेरिका आणि कॅनडामधील व्हिसा निर्बंधांमुळे बहुतेक भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियाला जात होत.
अमेरिका, कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे.
अशा परिस्थितीत भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याची आशा होती.
पण आता त्यांना तिथूनही मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.