सरकारनामा ब्यूरो
कौशल प्रदेशाची प्राचीन राजधानी असलेल्या अयोध्येला बौद्ध काळात साकेत म्हणून ओळखले जात होते.
मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित मंदिरांचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात.
भगवान रामाचे पूर्वज वैवस्वत मनू यांनी अयोध्येची स्थापना केली आणि महाभारताच्या काळापर्यंत सूर्यवंशी राजांनी या शहरावर राज्य केले.
दशरथांच्या महालात भगवान श्रीरामांचा जन्म झाला तसेच आदिनाथांसह 5 तीर्थंकरांचाही जन्म येथे झाला.
रामायणात इंद्रलोकाशी तुलना केलेल्या अयोध्येचे महत्त्व म्हणजे समृद्ध धान्य अन् रत्नांनी भरलेल्या या शहरातील गगनचुंबी इमारत.
महाराजा बृहदबल यांच्यापर्यंत सूर्यवंशाच्या पुढील 44 पिढ्यांपर्यंत ते इथे त्यांचा वास होता.
अशोक सम्राटाने या ठिकाणी विहिरी, तलाव, महाल आणि भव्य मंदिरे आणि काळ्या पाषाणाच्या 84 खांबांवर विशाल मंदिर बांधले.
काही कालांतराने बंगालचा नवाब अलीवर्दी खानची राजवट अवधपर्यंत वाढली होती.
अयोध्येतून 'अवध' शब्दची उत्पत्ती झाली, असे ठिकाण जिथे युद्धच होत नाही आणि तिथे नेहमीच शांतता असते. युद्धाने जिंकता न येणारं ठिकाण म्हणजे अयोध्या.