Amit Ujagare
अनेक वर्षे सुरु असलेल्या रामजन्मभूमीच्या वादावर सुप्रीम कोर्टानं निर्णायक निकाल दिल्यानंतर मंदिर अखेर उभं राहिलं. पण आता पुन्हा एकदा या मंदिरासंबंधी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे.
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकावर युक्तीवाद करताना अॅड. अनुप प्रकाश अवस्थी यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केला आहे की, मंदिरात येणाऱ्या देणगीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे.
या घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करुन या प्रकरणाचा तपास हा केंद्रीय अन्वेशन ब्युरो अर्थात सीबीआयकडं सोपवण्याचे निर्देश सरकारला देण्यात यावेत.
त्याचबरोबर या याचिकेत भाविकांनी दिलेल्या दानाची सुरक्षा, मंदिराच्या निधीचं कलेक्शन, अकाऊंटिंग आणि खर्चात पारदर्शकता निश्चित करण्यासाठी न्यायालयीन निरीक्षणाखाली व्यवस्था तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यावर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियातून चर्चा सुरु आहे. त्यातबरोबर नेत्यांबरोबर साधुंनी देखील यावर भाष्य केलं आहे.
या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाल्यानंतर एसआयटीच्या लखनऊ मंडळात आयुक्त विजय विश्वास, पोलीस महानिरीक्षक किरण एस. आणि अर्थ विभागाचे सचिव नील नितीन यांचा समावेश करण्यात आला आहे.
अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेस आण अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही या प्रकरणात अधिक लक्ष घालणयाची मागणी केली.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी राम मंदिर ट्रस्टच्या देणग्यांच्या रक्कमेतील घोटाळ्याची चौकशीत कुठलीही ढिलाई बाळगणार नाही असं आश्वासन दिलं आहे.