Sunil Balasaheb Dhumal
सामाजिक कार्यकर्ते, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी झाला. त्यांचा आज ९३ वा वाढदिवस आहे.
जनआंदोलनातून पुढे आलेले प्रभावी नेतृत्व म्हणून बाबांकडे पाहिले जाते.
बाबा आढाव यांच्यावर महात्मा फुले यांच्यासह समाजवादी विचारसरणीचा प्रभाव आहे. सत्यशोधक चळवळीची समाजाला आजही गरज आहे, असे त्यांचे मत आहे.
सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून बाबा आढावांनी 'एक गाव एक पाणवठा' ही मोहीम सुरू केली. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी जनआंदोलने उभारली.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ, महाराष्ट्रातील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, दलित, भटक्या व विमुक्त जाति –जमातींच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या अनेक चळवळींत ते अग्रभागी राहिले.
बाबांनी १९७५ ते १९७७ या काळात लादलेल्या आणीबाणीला विरोध केला होता.
महाराष्ट्रात झालेल्या विविध सामाजिक व राजकीय आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांनी अनेक वेळा तुरुंगवासही भोगला आहे.
बाबांनी समाजातील असंघटित कष्टकरीवर्गाला संघटित करण्याचे प्रयत्न केले. हमाल पंचायत ही संघटना बांधून श्रमजीवींचे प्रश्न सोडविण्याचे कार्य त्यांनी केले.