Rajanand More
कंकर मुंजारे हे मध्य प्रदेशातील बालाघाट लोकसभा मतदारसंघातील बीएसपीचे उमेदवार. ते माजी आमदार आहेत.
बालाघाट विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुभा मुंजारे या कंकर यांच्या पत्नी आहेत.
कंकर मुंजारे यांनी दोन दिवसांपुर्वी सोडले घर. एकाच छताखाली दोन विचारधारेच्या व्यक्ती राहू शकत नाहीत, असे दिले कारण.
मतदारसंघातील एक धरणाशेजारी झोपडीत राहत असल्याचा कंकर यांचा दावा. त्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल.
अनुभा या धर्मसंकटात सापडल्या आहेत. मतदारसंघात कुणाचा प्रचार करायचा, या संभ्रमात आहेत.
लग्नाला 33 वर्षे झाली. पतीच्या निर्णयामुळे निराश झाल्याचे अनुभा मुंजारे म्हणाल्या. मुलासह आम्ही आनंदाने राहतोय.
अनुभा यांनी काँग्रेसशी बांधिलकी दाखवत पतीच्या विरोधात काँग्रेसच्या उमदवाराचा प्रचार सुरू केला आहे.
मतदान 19 एप्रिलला. त्यानंतर घरी परतणार असल्याचे कंकर यांनी सांगितले. पती-पत्नीची मॅच फिक्सिंग वाटू नये म्हणून निर्णय.