Rashmi Mane
महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे या वादळाचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईत झाला.
बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करण्यात आली.
कमी कालावधीतच मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात झंझावाती नेतृत्व ठरले.
व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी 19 जून 1966 ला 'शिवसेना' या पक्षाची स्थापना केली.
बाळासाहेबांच्या कारकिर्दीची सुरुवात 1955 मध्ये इंग्रजी वृत्तपत्र 'द फ्री प्रेस जर्नल'मध्ये व्यंगचित्रकार म्हणून झाली. पुढे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत 'मार्मिक' हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केलं.
शिवसेना पक्ष सुरवातीच्या काळात कम्युनिस्ट विचारधारेच्या विरोधात कार्य करणारा पक्ष म्हणून नावारुपास आला.