Balasaheb Thorat : या आहेत बाळासाहेब थोरातांचे राजकीय वारसदार?

सरकारनामा ब्यूरो

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात या कॅन्सर तज्ञ असून टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.

Dr. Jayashree Thorat | Sarkarnama

कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी रुग्णांसाठी झोकून देत सेवा केली. या समाजकार्याच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत.

Dr. Jayashree Thorat, Balasaheb Thorat | Sarkarnama

“एकविरा फाउंडेशन”च्या माध्यमातून संगमनेरमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य तपासणी, समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवतं असतात.

Dr. Jayashree Thorat | Sarkarnama

फाउंडेशनच्या माध्यामातून महिला व युवतीसाठी करिअर मार्गदर्शन, स्नेह मेळावे, चर्चा सत्रे, मार्गदर्शन शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम,आरोग्य शिबिरे आयोजित करतात.

Dr. Jayashree Thorat | Sarkarnama

महिला - युवतींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विविध साहित्य वाटप यासारख्या कामातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Dr. Jayashree Thorat | Sarkarnama

डॉ. जयश्री यांना संगमनेर तालुक्यात 'जयाताई' म्हणून ओळखले जाते. सरळ, साधा स्वभावाच्या जयाताईंना कोणताही बडेजाव आवडत नाही.

Dr. Jayashree Thorat | Sarkarnama

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत जयश्रीताई देखील सहभागी झाल्या होत्या.

Dr. Jayashree Thorat, Rahul Gandhi | Sarkarnama

डॉ. जयश्री थोरात यांच्या राजकीय मार्गात अडथळा नको म्हणून सत्यजित तांबे यांना डावलण्यात आले का? अशी चर्चा होत असतांना.

Dr. Jayashree Thorat , Satyajeet Tambe | Sarkarnama

नुकतेच बाळासाहेब थोरातांनी डॉ. जयश्री यांचा वाढदिवस हे निमित्त साधतं राजकारणात जयश्री यांचे लाँचिंग केले आहे. तसेच सूचक वक्तव्य करत त्यांच्या अधिकृत राजकीय प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

Dr. Jayashree Thorat | Sarkarnama
येथे क्लिक करा