Deepak Kulkarni
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
बांग्लादेशच्या इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्यूनलने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तीन गंभीर प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आहे.
बांग्लादेशात 2024 मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिल्याचा ठपका होता.
याच हिंसाचार प्रकरणात बांग्लादेशच्या न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
बांग्लादेश न्यायालयानं हसीना यांना ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द होऊ शकते का? त्याचे काय पर्याय आहेत.
शेख हसीना यांना मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात ICT कायदा 1973 च्या कलम 21 नुसार बांग्लादेशातच अपील करावे लागेल. 60 दिवसांच्या आत ही अपील करावी लागणार आहे.
सध्या भारतात वास्तव्याला असलेल्या शेख हसीना या आपल्या वकिलांमार्फत हे अपील दाखल करू शकतात.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी 60 दिवसांत मृत्युदंडाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केली नाही तर फाशीची शिक्षा अंतिम होऊ शकते.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समिती वा इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडे शेख हसीना फाशीच्या शिक्षेविरोधात दाद मागू शकतात. पण हे अपील शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती किंवा रद्द करू शकत नाही.