सरकारनामा ब्युरो
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत.
सोमवारी (५ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता त्यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले.
दिल्लीत दाखल होताच सर्वात आधी त्यांनी निजामुद्दीन औलिया दर्ग्यात दर्शन घेतले.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी सायंकाळी हसीना यांची भेट घेतली.
त्यानंतर अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनीही शेख हसीना यांची भेट घेतली.
सोमवारी (५ सप्टेंबर) त्यांनी राजघाटावर पुष्पहार अर्पण केला.
हैदराबाद हाऊसमध्ये आज (६ सप्टेंबर) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
शेख हसीना यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
मैत्रीपुर्ण संबंधातून दोन्ही देशातील समस्या सोडवू, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.