Akshay Sabale
आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार पेटल्यानंतर अवघी 45 मिनिटं 15 वर्षांच्या सत्तेवर भारी पडली. शेख हसीना यांना पलायन करून भारतात यावं लागलं.
भारतात येताना शेख हसीना यांनी सोबत काय काय आणलं? किती पैसे अन् दागिने आणले? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...
शेख हसीना AJAX1431 लष्कराच्या विमानानं ढाक्यावरून भारतात आल्या. तेव्हा, त्यांच्याबरोबर फक्त दोन मोठ्या बॅगा होत्या.
शेख हसीना यांनी आणणेल्या बॅगांमध्ये आवश्यक कपडे आणि काही गरजेच्या वस्तू होत्या. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या घरातले सामान लुटून नेल्याचं व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
शेख हसीना यांच्याकडे अनेक बँक खाती आहेत. ज्यात करोडो रूपये आहेत. पण, देश सोडल्यानंतर त्यांची बँक खाती गोठवण्यात आली.
2024 मध्ये निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात शेख हसीना यांची त्यांची संपत्ती 4.36 कोटी बांगलादेशी टका असल्याचं सांगितलं होतं.
भारतीय रूपयांत विचार केल्यास शेख हसीना 3.14 कोटी रूपयांच्या मालकीण आहेत.