मतदार याद्यांबाबतचे ECINET अन् ERONET काय आहे?

Amit Ujagare

ज्ञानेश कुमार टार्गेटवर

मतदारांची नाव वगळणाऱ्या SIR प्रक्रियेवर एका मीडिया रिपोर्टमधून प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार टार्गेटवर आले आहेत.

Gnyanesh Kumar

SIR प्रक्रिया

या सर्व गोंधळात SIR प्रक्रियेत वापल्या जाणाऱ्या ECINET आणि ERONET हे पोर्टल काय आहेत? जाणून घेऊयात.

SIR

ERONET काय?

निवडणूक आयोगानुसार, ERONET ही एक केंद्रीकृत फॉर्म प्रक्रिया व्यवस्था आहे. याचा उपयोग मतदारांचे नाव नोंदवणे, हटवणे आणि त्यांचा पत्ता बदलणे यासाठी केला जातो.

ERONET

पूर्वी काय?

ERONETच्या पूर्वी भारतात मतदार यादी तयार करणे आणि त्यात बदल करण्यासाठी ३६ विविध व्यवस्थांचा वापर होत होता.

ERONET

ERONET काम काय?

ERONETचा प्रमुख हेतू विधानसभा मतदारसंघातील मतदारांची यादी तयार करणे तसंच त्यामध्ये गरजेचे बदल करुन ERO ची मदत करणं आहे.

ERONET

ECINET काय?

ECINET हा एक नवा अन् मोठा प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये निवडणुकीसंदर्भातील अनेक सुविधा या एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यात आल्या आहेत. जानेवारी २०२६ पासून हा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला.

ECINET

वेबसाईट्स एकत्र

या अंतर्गत मतदार, उमेदवार, निवडणूक अधिकाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या ४०हून अधिक व्यवस्था आणि वेबसाईट्सना एकत्र जोडण्यात आलं आहे.

ECINET

ECINET वर काय?

मतदारांसाठी ECINET वर नाव नोंदणी, मतदार यादीत नाव शोधणे, अर्ज करणे, इलेट्रॉनिक मतदान कार्ड मिळवणं आणि मतदान केंद्र आणि उमेदवारांशी संबंधित माहिती उपलब्ध आहे.

ECINET

सॉफ्टवेअरचा वाद

निवडणूक आयोगाकडून मात्र ERONETला ECINET पोर्टलच्या मतदार यादीचा भाग (पूर्वी ERONET) असं संबोधलं जातं. यासंदर्भातील वाद हा याच्या वादग्रस्त सॉफ्टवेअरबाबत आहे.

Election Commission of India

EROचे अधिकार

कायद्यानुसार, मतदार यादीवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार EROना असतात. पण सॉफ्टवेअरची रचना आणि कार्यप्रणाली ERO चे अधिकार मर्यादित करतात.

ERO