कुठे मारायचे? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाला धमकी, नेमकं काय घडलं?

Rajanand More

लेकाला धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा बॅरन ट्रम्प याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर एक वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा दावा आहे.

Barron Donald Trump | Sarkarnama

बक्षीस

व्हिडिओमध्ये बॅरन यांच्याबाबत माहिती देण्यात आली असून, १० दशलक्ष डॉलर म्हणजेच ९५ कोटी अधिक रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Barron Donald Trump | Sarkarnama

हालचालींवर नजर

प्रसारित व्हिडिओमध्ये २० वर्षीय बॅरन यांच्या हालचालींचे वर्णन तसेच दृश्ये दाखवण्यात आली आहेत. ते निगराणीखाली असल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे.

Barron Donald Trump | Sarkarnama

सुरक्षा भेदली

एका मुलीने अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसची सुरक्षा भेदून एका खासगी बैठकीत बॅरन यांच्या शेजारी बसल्याचा दावाही या व्हिडिओत करण्यात आल्याने अमेरिकेला धक्का बसला आहे.

Barron Donald Trump | Sarkarnama

संघर्ष

अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली जात आहे.

Barron Donald Trump | Sarkarnama

आक्रमक

इराणचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतल्याचे समजते. इराणवर कडक निर्बंध लादण्यासोबतच लष्करी कारवाईचेही संकेत दिले जात आहेत.

Barron Donald Trump | Sarkarnama

बॅरन ट्रम्प

बॅरन ट्रम्प हा डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांचा मुलगा आहे. तो वडिलांच्या राजकीय जीवनापासून चार हात दूर असल्याचे सांगितले जाते.

Barron Donald Trump | Sarkarnama

उद्योगाची आवड

डोनाल्ड ट्रम्प हे उद्योजक असून त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्यासाठी बॅरनही उत्सुक आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या बॅरनने काही महिन्यांपूर्वीच एक कंपनीही सुरू केली आहे.

Barron Donald Trump | Sarkarnama

NEXT : निलंबित महिला IAS अधिकाऱ्याने राज्य सरकारला झुकवले, केंद्राला करावे लागले नवे नियम

येथे क्लिक करा.