Sunil Balasaheb Dhumal
बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते आहेत.
ते मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील उमरग्याच्या मुरूमचे रहिवासी आहेत.
राजकीय वर्तुळात बसवराज पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात.
ते काँग्रेसचे निष्ठावंत असून औसा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.
2009 आणि 2014 अशा दोन निवडणुकांमध्ये ते औसा येथून विजयी झाले होते.
काँग्रेसने त्यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रीपद दिले होते.
२०१९ मध्ये अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर बसवराज पाटील हे काँग्रेसमध्ये काहीसे साईडलाईन झाल्याची चर्चा होती.
आता बसवराज पाटील यांनी भाजपची वाट धरल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.