Rashmi Mane
भारतीय नागरी सेवेंतर्गत 'आयएएस' अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केली जाते. ही परीक्षा सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.
'आयएएस' अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेत सर्वात वरच्या स्तरावर असतो. त्या पदाच्या वर केवळ मंत्री असतात.
भारतात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेंतर्गत केवळ तीन पदांची भरती होते ज्यात IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
'यूपीएससी' परीक्षा देण्यासाठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे आहे. या परीक्षेची तयारी करायची असेल तर ती या वयापासूनच करावी. कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३२ वर्षं असून उमेदवाराला ६ वेळा ही परीक्षा देता येते.
दररोजचे वर्तमानपत्र आणि नियतकालिक वाचणं अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते.
दहावीनंतर असा विषय निवडा, ज्यात तुम्हाला रस आहे आणि हाच विषय तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी निवडू शकाल. पसंतीचा विषय आधीच ठरल्याने तुम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.
'यूपीएससी' परीक्षेत एकूण २५ विषयांमधून आपल्याला विषय निवडायचा असतो. तोच विषय निवडा, जो तुम्हाला अभ्यासायला सोपा जाईल.
वेळेचे योग्य नियोजन करा. एक रुटीन तयार करा आणि त्याप्रमाणे तयारी करा.