सरकारनामा ब्यूरो
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांची आज (15 मार्च 1934) जयंती आहे. त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता.
कांशीराम यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रातून केली होती. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशात बहुजनांच्या राजकारणाचा पाया रचला.
कांशीराम यांनी भारतीय राजकारण आणि समाजात मोठे बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या कांशीराम यांनी 14 एप्रिल 1984 मध्ये एका नव्या आंदोलनाची सुरुवात करत बहुजन समाज पक्षाची स्थापना केली.
कांशीराम यांनी आपल्या कतृत्वाने देशाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली.
9 ऑक्टोबर 2006 मध्ये बसपाचे संस्थापक कांशीराम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं.