Amit Ujagare
भगतसिंग-राजगुरु-सुखदेव या क्रांतीकारकांचा आज शहीद दिवस. २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिश सरकारनं या तिघांना एकाच वेळी फासावर चढवलं होतं. यात केवळ २३व्या वर्षी भगतसिंगांनी आपलं प्राणार्पण केलं.
भगतसिंग हे कम्युनिस्ट विचारांनी भारलेले, विचारांची स्पष्टता असलेले तडफदार नास्तिक तरुण होते. आज शहीद दिनानिमित्त भगतसिंग यांच्याबाबतच्या एका मिथकाबाबत आज माहिती घेणार आहोत.
३) भगतसिंग हे पंजाबी सरदार असल्यानं लांब केस आणि डोक्यावर पगडी असा त्यांचा सुरुवातीच्या काळात पारंपारिक पेहराव असायचा. पण सध्या त्यांचा पिवळ्या पगडीतला फोटो खूपच प्रसिद्ध आहे.
आम आदमी पार्टीनं देखील भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंपैकी कायम भगतसिगांचा पिवळ्या पगडीवरचा फोटो वापरलेला दिसतो. पण हा फोटो खरा नसल्याचं इतिहासतज्ज्ञ सांगतात.
इतिहासतज्ज्ञ चमनलाल यांच्या मते भगतसिंगांनी कधीही पिवळ्या रंगाची पगडी वापरलेली नाही. कारण अवघ्या २३ व्या वर्षापर्यंतच आयुष्य ते जगले, त्यामुळं या वयापर्यंतचे त्यांचे केवळ चारच मूळ फोटो सध्या उपलब्ध आहेत.
भगतसिंग यांचा एक शाळकरी वयातला आणि दुसरा लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये असतानाचा मूळ फोटो उपलब्ध आहे, यामध्ये त्यांच्या डोक्यावर कायम पांढऱ्या रंगाची पगडी असायची.
तसंच २०-२२ वर्षाचे भगतसिंग पोलीस कस्टडीमध्ये असताना लांब केस बांधलेले आणि एका खाटेवर बसलेला एक मूळ फोटो उपबल्ध आहे.
तसंच पोलिसांना चकवा देण्यासाठी पेहराव बदलेला अर्थात गुडघ्यापर्यंतचा काळा कोट, पँट, पायात शूज तसंच केस कापलेले डोक्यात हॅट, क्लीनशेव्ह व पिळदार मिशी असा चौथा मूळ फोटो उपलब्ध आहे.
पण या चार फोटों व्यतिरिक्त भगतसिंग यांचा सध्या सर्वाधिक प्रचलित असलेला पिवळ्या पगडीवरचा फोटो आहे. हा पहिल्यांदा १९७५ मध्ये अमर सिंग या एका चित्रकारानं काढलेल्या चित्रावरुन घेतलेला आहे, हा त्यांचा मूळ फोटो नाही.