सरकारनामा ब्यूरो
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा सोमवारी (7 ऩोव्हेंबर) महाराष्ट्रात दाखल झाली
दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून सुरू झालेला हा प्रवास कर्नाटकातून तेलंगणा आणि आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे.
तेलंगणामध्ये एका ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हाती मशाली दिसल्या होत्या. महाराष्ट्रात दाखल झालेली काँग्रेसची मशाल यात्रा ही भव्य अशीच होती.
स्वत: राहुल गांधी यांनी हातात मशाल घेतली होती. त्यांच्यासोबत हजारो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हातात मशाली घेऊन चालत होते.
राहुल गांधी यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
त्यांना पाहण्यासाठी संपूर्ण देगलूरमध्ये प्रचंड मोठा जनसमुदाय जमला होता.
बॅनर, झेंडे आणि राहुल गांधी यांची प्रतिमा हाती घेत हजारो नागरिक यात्रेच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होते.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही या यात्रेत सहभागी झाले आहेत
नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली असून ही यात्रा श्रीनगर येथे संपणार आहे.