सरकारनामा ब्यूरो
पुण्यातील प्रमुख हिंदुत्ववादी नेत्यांपैकी एक असलेले धीरज घाटे हे पुणे शहराचे भाजप अध्यक्ष आहेत.
धीरज घाटे यांची कर्मभूमी पुणे असले तरी त्यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आहे.
लहानपणापासूनच धीरज घाटे यांनी संघामध्ये कामाला सुरुवात करून सामाजिक परिघात सक्रिय राहिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दीर्घकाळ कार्य करत राहिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीतून राजकारणातही प्रवेश केला.
पुण्याच्या नवी पेठेतील साने गुरुजीनगरमधील एका सामान्य कुटुंबातून ते आले. अनेक वर्षांच्या पायाभरणीनंतर ते राजकारणात प्रसिद्ध झाले.
भाजपशी एकनिष्ठ असलेले धीरज घाटे यांना प्रखर हिंदुत्वाचे शिलेदार म्हणून ओळखले जाते.
पुणे महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी 2017 मध्ये जिंकली. नगरसेवक झाल्यानंतर 2019 मध्ये त्यांची सभागृह नेतेपदी निवड झाली.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले धीरज घाटे हे जनसेवेत कायम तत्पर असतात.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील अनेक गणेश मंडळांशी घाटे यांची चांगले संबंध आहेत. साने गुरुजी मित्रमंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानमध्येही बऱ्याच वर्षांपासून ते सक्रियपणे कार्यरत आहेत.
R