Rashmi Mane
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काल (16 एप्रिल ) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
या पक्ष प्रवेशामुळे भाजपला मोठा फटका बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
आज (17 एप्रिल) जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते सिद्धारमैया, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शेट्टार यांच्या प्रवेशामुळे कर्नाटकातील काँग्रेसचं बळ वाढलं आहे