Roshan More
बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यामध्ये होत आहे. सहा आणि 11 नोव्हेंबरला मतदान आणि 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत.
बिहारमध्ये सात कोटी 43 लाख मतदार आहेत. यामध्ये 3.92 कोटी पुरूष तर, 3.50 कोटी महिला आहेत.
सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किमान 122 जागांचे बहुमत आवश्यक असते.
243 जागांपैकी 38 जागा अनुसूचित जातींसाठी (SC) आणि 2 जागा अनुसूचित जमातींसाठी (ST) राखीव आहेत.
बिहार विधानसभेची पहिली निवडणूक 1952 साली झाली होती.
राजद (RJD), जेडीयू (JDU), भाजप (BJP), काँग्रेस (INC) हे राज्यातील प्रमुख पक्ष आहेत.