Dinvishesh 15 December : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

दिनविशेष - 15 डिसेंबर

1905 - ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, लेखिका डॉ. इरावती कर्वे यांचा जन्म. "मनुष्याच्या डोक्‍याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता' या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी बर्लिन विद्यापीठातून पीएच.डी पदवी मिळविली. त्यांचे सुमारे 80 संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या "युगान्त' या ग्रंथास साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले.

1932 - भारतीय निवडणूक प्रणालीत अमुलाग्र सुधारणा करणारे, निवडणूक आचारसंहितेच्या पालनाबाबत ठाम भूमिका घेणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचा जन्म

1950 - पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे स्वतंत्र भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. त्यांना 1991 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

1985 - मॉरिशनचे पहिले पंतप्रधान शिवसागर रामगुलाम यांचे निधन

1989 - काश्मीरमधील अतिरेक्यांचा हिंसाचार रोखण्यासाठी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात बेमुदत संचारबंदीची सरकारची घोषणा

1991 - ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना चित्रपटक्षेत्रातील असाधारण कामगिरीसाठी "खास ऑस्कर' पारितोषिक जाहीर.

1999 - मुंबईच्या शिवसेना नगरसेविका अनिता बागवे यांच्या पतीच्या हत्येप्रकरणी स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यास अध्यक्षांनी नकार दिल्याने विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ

2002 - गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा लक्षणीय विजय. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते विजयाचे शिल्पकार

Next : अंतरिम जामीन म्हणजे काय?

येथे क्लिक करा