अनुराधा धावडे
महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (12 डिसेंबर) वाढदिवस आहे.
महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपुर्ण देशाच्या राजकारणात एक मुत्सदी राजकारणी, पुरोगामी आणि शेतीतज्ञ अशी शरद पवार यांची ओळख आहे.
शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात झाला.
महाविद्यालयीन जीवनातच ते कॉंग्रेसच्या संपर्कात आले, वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरुन त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
१९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून निवडून आले.
१८ जुलै १९७८ रोजी पहिल्यांदा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले शरद पवार हे राज्यातील पहिले सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.
त्यानंतर शरद पवार तब्बल चार वेळा मुख्यमंत्री झाले
तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशीही पवारांचे संबध चांगले होते. नरसिंहरावांनी पवारांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी दिली.
त्यांच्यासमोर गृह, अर्थ आणि संरक्षण असे पर्याय ठेवले. त्यातून शरद पवार यांनी संरक्षण आणि कृषी खात्याची जबाबदारी स्वीकारली.