अनुराधा धावडे
योगी आदित्यनाथ यांचं लहानपणीच नाव अजय सिंग बिष्ट. त्यांना एकूण सात भावंडे आहेत. त्यांनी हेमवती नंदन बहुगुणा विद्यापीठातून गणित विषयात बीएससी पदवी प्राप्त केली.
1990 मध्ये राममंदिर आंदोलनादरम्यान अजय सिंह यांनी गोरखनाथ मंदिराचे महंत अवेद्यनाथ यांची भेट घेतली. अवेद्यनाथ यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
1993 मध्ये एक दिवस नोकरीच्या बहाण्याने अजय बिष्ट यांनी घर सोडून गोरखपूरला गेले. वर्षभरापासून त्याच्या कुटुंबाला मुलगा कुठे आहे याचीही कल्पना नव्हती.
1998 मध्ये, योगी आदित्यनाथ यांनी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी गोरखपूरमधून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी 26 हजार मतांनी निवडणूक जिंकली. पहिल्यांदा विजयी झाल्यानंतर त्यांनी संसदेत संस्कृतमध्ये खासदार म्हणून शपथ घेतली.
योगी आदित्यनाथ हे लोकप्रतिनिधी म्हणून गोरखनाथ मंदिरात लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठीही प्रसिद्ध आहेत.
2017 मध्ये भाजपने उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमताने विजय मिळवला. योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. 21 मार्च रोजी त्यांनी गोरखपूरमधून खासदार म्हणून शेवटचे भाषण दिले
2017 मध्ये प्रथमच मुख्यमंत्री झाल्यानंतर तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांनी योगी आदित्यनाथ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
योगी सरकार पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था, विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर 2022 च्या निवडणुकीत उतरले. गोरखपूर विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली आणि जिंकली. योगी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अयोध्येतील राम मंदिराबाबत निर्णय आला आणि त्यानंतर योगी सरकारने मंदिर उभारणीच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाबाबत तातडीने पावले उचलली. यावरुन त्यांच्यावर हिंदुत्वाचा अजेंडा चालवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.
दुसऱ्या टर्ममध्ये योगी सरकारने माफिया आणि गुन्हेगारांवर कारवाईबाबत अत्यंत आक्रमक वृत्ती स्वीकारली होती. गुन्हेगारांच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी योगी सरकारने त्यांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली.
राज्यातील कुख्यात माफिया मुख्तार अन्सारी, अतिक अहमद आणि विजय मिश्रा यांच्या व्यतिरिक्त किरकोळ गुन्हेगारही याच्या कचाट्यात आले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे लोक योगीला 'बुलडोजर बाबा' म्हणू लागले.