सरकारनामा ब्युरोे
भाजपच्या पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८० ते १९८६ या काळात कामकाज पाहिले. त्यानंतर ते पहिले काँग्रेहविरहित पंतप्रधान बनले होते.
१९८६–१९९१, १९९३–१९९८ आणि २००४–२००५ असे तीन वेळा अध्यक्ष राहिले. भाजपची स्थापना आणि पक्ष वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
१९९१ ते १९९३ या काळात ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. यांच्या कारकिर्दीत भाजप प्रथमच मुख्य विरोधक पक्ष बनला.
देशातील राजकाराणात भाजपला महत्वाचे स्थान मिळवून देण्यात ठाकरेंचे मोठे योगदान आहे. ते १९९८ - २००० मध्ये अध्यक्ष होते.
बंगारु लक्ष्मण हे २००० ते २००१ या वर्षात अध्यक्षपदी होते. दलित समाजातील ते भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
कृष्णमूर्ती भाजपचे संस्थापक सचिव होते. २००१ ते २००२ या काळात त्यांनी भाजपचे अध्यक्षपद भूषविले.
भारतीय विद्यार्थी परिषदेतून (ABVP) राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ - २००४ या काळात त्यांनी अध्यक्ष होते. सध्या ते भारताचे उपराष्ट्रपती आहेत.
२००५ -२००९ आणि २०१३ - २०१४ असे दोन वेळा पक्षाचे अध्यक्ष होते. पक्षाच्या पराभवाची जाबाबदारी घेत त्यांनी २००९ मध्ये राजीनामा दिला. तर गृहमंत्री पद स्वीकारण्यापूर्वी २०१४ मध्ये राजीनामा दिला.
सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गडकरी यांनी २००९ ते २०१३ या काळात पक्षाचे कामकाज पाहिले.
२०१४ ते २०२० या काळात पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांचा २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकीत भाजपला मोठे यश प्राप्त करून देण्यात सिंहाचा वाटा. सध्या ते केंद्रीय गृहमंत्री आहेत.
विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा २०२० पासून भाजपचे ११ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.