Sushil Kumar Modi : बिहारमध्ये भाजपला 'अच्छे दिन' आणणारा नेता हरपला!

Sunil Balasaheb Dhumal

निधन

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन झाले आहे.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

कॅन्सर

कॅन्सरने त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

संघटन कौशल्य

बिहारमध्ये भाजपचे प्रभावशाली संघटन तयार करणारे नेते म्हणून मोदी यांची ओळख होती.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

अच्छे दिन

आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी भाजपला प्रत्येक निवडणुकीत अच्छे दिन दाखवण्याचा प्रयत्न केला.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

राजकीय प्रवास

मोदींनी त्यांचा राजकीय प्रवास पाटणा विद्यापीठात एक कार्यकर्ता म्हणून सुरू केला होता.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

सरचिटणीस

त्यांनी 1973 मध्ये विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम केले होते.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

उपमुख्यमंत्री

मोदींनी जनता दल (युनायटेड) प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून सुमारे 11 वर्षे काम केले.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

तीन वेळा विजय

त्यांनी 1990 ते 2004 दरम्यान तीन वेळा बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

विरोधी पक्षनेते

1996 ते 2004 पर्यंत ते बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

राष्ट्रीय उपाध्यक्ष

मोदी यांची २००३ ते २००५ मध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Sushil Kumar Modi | Sarkarnama

NEXT : वाराणसी झाली 'मोदी'मय, भव्य रोड शो!