Rashmi Mane
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुणे दौऱ्यावर आहेत.
नड्डा यांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.
जे. पी. नड्डा यांच्या हस्ते गणपतीची आरतीदेखील करण्यात आली.
काल जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
वर्षा बंगल्यावर नड्डा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे हेही एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.