Rashmi Mane
2024 च्या लोकसभा निवडणुका लवकरचं होणार आहेत.
त्यामुळे भाजप अॅक्शन मोडमध्ये आला आहे. भाजपने पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत.
पक्षाने पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंडमधील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत.
या फेरबदलात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकीचीही काळजी घेण्यात आली आहे. भाजपने निवडणुकांपूर्वी 4 राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले आहेत.
मरांडी यांना झारखंड राज्यातील भाजपची कमान सोपवण्यात आली आहे.
पंजाबमध्येही पक्षाने बदल केले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले सुनील जाखड यांना भाजपने प्रदेशाध्यक्ष बनवले आहे.
तेलंगणा राज्याच्या निवडणुकीसाठी भाजपने जी किशन रेड्डी यांची नेमणूक करण्यात आली आहे. रेड्डी यांना पक्षाने तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष दग्गुबती पुरंदेश्वरी या आधी काँग्रेसमध्ये होत्या. मात्र, २०१४ मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुरंदेश्वरी 2020 पासून ओडिशा भाजपच्या राज्य प्रभारी देखील आहेत.