Rashmi Mane
आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कीविरुद्ध मोठ्या संख्येने लोक निषेध करत आहेत. आता भारतात बॉयकॉट तुर्की असा ट्रेंड सुरु आहे.
तुर्कीची एकूण लोकसंख्या 8.53 कोटी आहे. असोसिएशन ऑफ रिलिजन डेटा आर्काइव्हजच्या अहवालानुसार, येथील एकूण लोकसंख्येपैकी 99 टक्के मुस्लिम आहेत.
तुर्की हा मुस्लिम देश असला तरी, येथे हिंदू लोकसंख्येचे लोक देखील तेथे राहताl.
माहितीनुसार, तुर्कीयेमध्ये राहणारे हिंदू धर्माचे पालन करणारे लोक व्यावसायिक, विद्यार्थी किंवा कामगार म्हणून काम करतात.
दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी तुर्कीमध्ये येतात. ज्यामुळे भारतीयही येथील अर्थव्यवस्थेत योगदान देतात. 2024 मध्ये सुमारे 3.30 लाख लोक येथे पर्यटनासाठी गेले होते.
दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय येथे येतात. तुर्कीच्या अर्थव्यवस्थेचा 12 टक्के भाग भारतीय पर्यटकांकडून येतो.
पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर तुर्कीला भारतात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान, तुर्कीला जाणाऱ्यांनी बुकिंग रद्द केले आहे.