Rashmi Mane
केंद्र सरकारने येत्या जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. हे कधी सुरु होईल? याचे सध्या तरी कोणतेही उत्तर मिळालेले नाही.
परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की जनगणनेत जात गणना करण्यासाठी कोणतेही मोठे काम करावे लागणार नाही. कारण यावेळेस जनगणना पहिल्यांदाच पूर्णतः डिजिटल स्वरूपात होणार आहे. यासाठी मोबाईल अॅप्स आणि टॅबलेट्सचा वापर होणार आहे.
व्यक्ती कोणत्या जातीतील आहे?
उपजात (उदा. कुनबी, महार, माळी इ.) कोणती?
तुमच्याकडे अधिकृत जात प्रमाणपत्र आहे का?
मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : SEBC, EWS, OBC, SC, ST यामध्ये मोडता का?
शिक्षण किंवा नोकरीमध्ये आरक्षणाचा फायदा मिळाला आहे का?
एकाच घरात वेगवेगळ्या जातींचे सदस्य असल्यास त्यांची माहिती.
मातृभाषा कोणती आहे?
धर्म कोणता आहे?
शिक्षण कोणत्या स्तरापर्यंत झाले आहे?
उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे?
सरकारी/खाजगी नोकरी?
शेती, व्यापार, मजुरी इ. व्यवसायाची माहिती.