Rajanand More
इराण आणि इस्त्राईलमध्ये मागील काही दिवसांपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. पण यामध्ये इस्त्राईलच्या गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादच्या एका महिला एजंटच्या कारनाम्याचीच चर्चा जगभर होत आहे.
कॅथरीन ही मोसाद एजंट असून सध्या तिच्या भीतीने इराण हादरले आहे. लेडी किलर म्हणून तिचा उल्लेख होत आहे.
मागील आठ दिवसांत इराणमधील नऊ शास्त्रज्ञ व अधिकारी ठार झाले आहेत. त्यांना ठार करण्यात कॅथरीनचा सर्वात मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे.
मुळची फ्रेंच असलेली कॅथरीन दोन वर्षांपूर्वी इराणध्ये दाखल झाली. शिया इस्लाम धर्म स्वीकारत तिने तेथील महिलांप्रमाणे वावरण्यास सुरूवात केली. तिच्यावर कुणाचाही संशय़ही आला नाही.
मोसादने कॅथरीनला इराणच्या विरोधातील एका विशेष मोहिमेवर पाठवले होते. इराणमधील वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या पत्नीशी ओळख वाढवून घरातही येणे जाणे वाढवले.
तिने गुप्त भागांमध्ये, ठिकाणांवर जाऊन तेथील माहिती जमा केली. तेथील फोटो, व्हिडीओ काढत ती मोसादला पाठवत होती.
इराण-इस्त्राईलमधील संघर्षादरम्यान महत्वाचे अधिकारी आपली ठिकाणे सतत बदलत होते. कॅथरिनचे त्यांच्यावर नजर होती. ती माहिती मोसादला कळवत राहिली.
कॅथरिनच्या दिलेल्या माहितीनुसार इस्त्राईलकडून संबंधित ठिकाणांवर अचूक हल्ला केला जात होता. या हल्ल्यांमध्ये आठ दिवसांत नऊ महत्वाचे अधिकारी व शास्त्रज्ञ ठार झाले आहेत.