Rashmi Mane
श्रावण महिना हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्व आहे.
श्रावण महिन्यात मंगळागौरीचे आयोजन केले जाते. महिलांसाठी हा सण खास असतो.
मंगळागौरीच्या दिवशी सर्व महिला एकत्र जमतात आणि रात्री जागून खेळ खेळण्याची प्रथा आहे
मुंबईत मंगळागौर कार्यक्रमात शर्मिला ठाकरे, सुनेत्रा पवार, वृषाली शिंदे यांनी फुगडी खेळत या उत्सवाचा आनंद घेतला.
'सणासुदीची घेऊन उधळण, आला हा हसरा श्रावण, सौभाग्यवती पुजती मंगळागौर,
खेळ खेळूनी...' असे म्हणत अंकिता पाटील यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
यावेळी ठाकरेंच्या दोन्ही सूना शर्मिला ठाकरे आणि अंकिता ठाकरे यांनी घेतला फुगडीचा आनंद.