Rashmi Mane
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्यांसह पेंशनर्ससाठी मोठा आर्थिक आणि सामाजिक आराम देणारा पॅकेज जाहीर केला आहेत.
8व्या वेतन आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत असलेल्या कर्मचार्यांसाठी सध्या कोणताही अपडेट नाही, तरीही सरकारने या सणासुदीच्या काळात पाच महत्त्वाच्या घोषणांची केल्या आहेत. या निर्णयांमुळे एकूण 1 कोटीहून अधिक लोकांना थेट फायदा होणार आहे.
सरकारने महागाई भत्ता (DA) व महागाई राहत (DR) मध्ये 3% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 जुलै 2025 पासून लागू झाला आहे.
यामुळे सुमारे 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेंशनर्सना फायदा होत आहे. आता DA 55% वरून 58% झाला आहे. तर दर सहा महिन्यांनी DA मध्ये सुधारणा केली जाते आणि पुढील सुधारणा जानेवारी 2026 पासून लागू होईल.
केंद्रीय सरकारी आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत उपचार व मेडिकल पॅकेजच्या दरांमध्ये 15 वर्षांनंतर मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन दर 13 ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्यात आले असून, सुमारे 46 लाख CGHS लाभार्थींना फायदा होईल.
सरकारने ग्रुप C व नॉन-गॅझेटेड ग्रुप B कर्मचार्यांसाठी 2024-25 साठी 30 दिवसांचा एड-हॉक बोनस जाहीर केला असून, डाक विभागाने 60 दिवसांचा उत्पादकता-बोनस (PLB) देण्याचा आदेश दिला आहे. हा निर्णय दिवाळीपूर्वी लागू केला गेला आहे.
पेंशनर्ससाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठ नागरिकांना बँकेतील रांगा टाळता येतील आणि घरबसल्या सर्टिफिकेट जमा करता येईल.
युनिफाइड पेंशन स्कीम (UPS) अंतर्गत कर्मचारी अधिक स्थिर व सुरक्षित पेन्शन लाभ घेऊ शकतील. UPS मध्ये सामील होण्याची अंतिम तारीख आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.