Champai Soren News : 'झारखंड टायगर' असणार नवे मुख्यमंत्री, कोण आहेत चंपई सोरेन?

Roshan More

हेमंत सोरेन यांचा राजीनामा

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला आहे. ईडीकडून त्यांना अटक झाली आहे. मात्र, अटकेपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांचे नाव सुचवले आहे.

Champai Soren | Sarkarnama

'टायगर' नावाने प्रसिद्ध

चंपई सोरेन हे झारखंडच्या राजकारणात 'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध आहेत.

Champai Soren | Sarkarnama

वरिष्ठ नेता

चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते असून शिबू सोरेन यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे आदिवासी कल्याण विभागाचा कार्यभार होता. (Champai Soren News )

Champai Soren | Sarkarnama

शेतकरी ते मुख्यमंत्री...

राजकारणात येण्यापूर्वी चंपई सोरेन हे शेती करत होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली तर शेतकरी ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास असणार आहे.

Champai Soren | Sarkarnama

'सरायकेला'मधून विजयी

चंपई सोरेन हे सरायकेला मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Champai Soren | Sarkarnama

परिवहन मंत्री

हेमंत सोरेन मंत्रिमंडळात मंत्री चंपई सोरेने हे हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात परिवहन,अनुसूचित जाती आणि मागासवर्ग कल्याणमंत्री आहेत.

Champai Soren | Sarkarnama

विधिमंडळ नेतेपदी निवड

चंपई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

Champai Soren | Sarkarnama

NEXT : वंचितने लोकसभेत 'या' दिग्गज नेत्यांना दिला होता दणका; पाहा फोटो!

Vanchit Lok Sabha Factor : | Sarkarnama
येथे क्लिक करा