अनुराधा धावडे
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह काल दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात स्वामीनारायणाचे दर्शन घेतले.
ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती जवळपास 45 मिनिटे मंदिरात थांबले. मुख्य मंदिराच्या मागे असलेल्या दुसऱ्या मंदिरात त्यांनी जलाभिषेक केला.
त्यांच्या सुरक्षेसाठी मंदिराच्या आत आणि बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सुनक यांनी जमिनीवर डोके टेकवून देवाला नमस्कार केला.
सुनक यांनी अक्षरधाम मंदिरात छायाचित्रे काढली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. माझ्यावरही असेच संस्कार झाले आणि मी असाच आहे. मला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी येत राहीन.
मंदिरातील संत महंतांनी मंदिराची आठवण व्हावी, यासाठी ऋषी सुनक यांना संपूर्ण अक्षरधाम मंदिर दाखवले आणि नंतर त्यांना मंदिराचे मॉडेल भेट म्हणून दिले.
या वेळी हलका पाऊस पडत होता, त्यामुळे ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती मंदिराच्या आवारात छत्री घेऊन जाताना दिसले.