Rashmi Mane
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत आजपासून पैसे थेट बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून ही रक्कम 9 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाठवण्यात येत आहे.
कृषी विभागाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे की हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल आणि पैसे ऑनलाइन पद्धतीने पाठवले जात आहेत.
राज्यातील 92 लाख 91 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या सातव्या हप्त्यासाठी 1,932 कोटी 72 लाख रुपये सरकारने निधी म्हणून वाटप केले आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत.
शेतकऱ्यांना आता हे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही, हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तपासता येऊ शकते.
पैसे जमा झाले की तुमच्या फोनवर मेसेज येईल. तसेच बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासल्यास पैसे खात्यात आले आहेत की नाही हे कळेल.
शेतकरी PM Kisan किंवा NSMNY योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही आपली पेमेंट स्टेटस तपासू शकतात. यासाठी वेबसाइटवर जाऊन Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर लॉगिन करा आणि येणाऱ्या OTP टाकल्यावर आपली Beneficiary Status स्क्रीन दिसेल. जर Eligibility Details दिसली, तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात. तर Ineligibility दिसली, तर शेतकरी अपात्र आहे असा त्यांचा अर्थ होतो.