Anganwadi Workers : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ५८ अंगणवाडी सेविकांना नियुक्तीपत्र प्रदान

सरकारनामा ब्यूरो

नियुक्तीपत्रे प्रदान सोहळा

महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

CM Appointment Letters to Anganwadi Workers | Sarkarnama

कार्यक्रम

सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत हा कार्यक्रम पार पडला.

CM Appointment Letters to Anganwadi Workers | Sarkarnama

अकरा हजार नवनियुक्ती

भरती प्रक्रियेद्वारे १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका नवनियुक्त झाल्या आहेत.

CM Appointment Letters to Anganwadi Workers | Sarkarnama

नियुक्तीपत्र प्रदान

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यापैकी मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ अंगणवाडी कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

CM Appointment Letters to Anganwadi Workers | Sarkarnama

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे उपस्थित होते.

CM Appointment Letters to Anganwadi Workers | Sarkarnama

उपस्थिती

महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, स्माईल फाऊंडेशनच्या संचालक उमा आहुजा व धीरज आहुजा, मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ नवनियुक्त अंगणवाडी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

CM Appointment Letters to Anganwadi Workers | Sarkarnama

चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

CM Appointment Letters to Anganwadi Workers | Sarkarnama

आदिती तटकरे

अंगणवाडी कर्मचारी हे फक्त पोषण आहार देणे व बालकांचे संगोपन करणे एवढेच काम करत नसून सुदृढ बालक आणि सक्षम पिढी घडविण्याचे काम करत असतात. अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमात केली.

CM Appointment Letters to Anganwadi Workers | Sarkarnama

शासन प्रयत्नशील

राज्यातील प्रत्येक बालक सुदृढ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही यावेळी दिली.

CM Appointment Letters to Anganwadi Workers | Sarkarnama

Next : बाईक राइड, मुलांसोबत मस्ती... लडाखमध्ये दिसली राहुल गांधींची हटके स्टाईल, पाहा फोटो !