Chetan Zadpe
केसीआर यांचा नुकताच अपघात झाला होता, घरात ते पाय घसरुन पडले होते. यामुळे ते दवाखान्यात दाखल होते.
तेलंगणचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हे आज माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दवाखान्यात पोहचले होते.
यावेळी केसीआर आणि रेड्डी यांच्यात काही वेळासाठी संवाद घडून आला. काळजी घेण्याचे आवाहन करत त्यांनी हात जोडून माजी मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला.
आपली प्रकृती आता सावरत आहे, असे केसीआर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
यावेळी लवकर बरे होऊन राज्यात पुन्हा सक्रिय व्हा, असे शुभचिंतन मुख्यमंत्री रेंड्डी यांनी माजी मुख्यमंत्र्यांना केले.