सरकारनामा ब्यूरो
LBSNAA हे (Lal Bahadur Shastri National Administration Academy) चे पूर्ण नाव आहे.
हे एक प्रशिक्षण केंद्र आहे. जिथे UPSC नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना बोलावले जाते.
बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि मालदीवच्या नागरी सेवकांनादेखील या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षण केंद्रात कठोर नियमांचे पालन करावे लागते. केंद्राच्या परिसरात फोनचा वापर तसेच धूम्रपान आणि मद्यपानदेखील प्रतिबंधित आहे.
1958 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी ही राष्ट्रीय अकॅडमी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
सुरुवातीला या अकॅडमीचे नाव 'राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी' असे ठेवण्यात आले होते.
1927 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृतीनिमित्त याचे नामकरण 'लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी' असे करण्यात आले.
उत्तराखंड येथील मसुरी शहराच्या डोंगराळ भागात हे नयनरम्य ठिकाण वसलेले आहे.
R