सरकारनामा ब्यूरो
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीच्या बाजूने कौल देणारे न्यायमूर्ती म्हणून त्यांची ओळख आहे.
सौम्य व मृदूभाषी न्ययाधीश अशी ओळख असलेले, न्या. चंद्रचुड शास्त्रीय संगीताचेही दर्दी आहेत.
न्या. चंद्रचूड यांनी 'सात' वैशिष्ट्यपूर्ण निकाल दिले आहेत.
ऐतिहासिक राम मंदिर निकालः ७० वर्षांहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम मंदिरच्या कायदेशीर लढ्यात, राम मंदिर त्याच जमिनीवर बांधले जावे, असा निकाल देणाऱ्या घटनापीठात न्या. चंद्रचूड यांचाही समावेश होता.
समलैंगिकता हा गुन्हा नाहीः २ प्रौढ व्यक्तींमध्ये सहमतीने समलैंगिक संबंध असतील तर तो गुन्हा ठरणार नाही.
व्यभिचार कायदाः ब्रिटीशकालीन 'व्यभिचार कायदा' हा घटनाविरोधी आणि समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. हा कायदा स्त्रीला निवड करण्याचा अधिकारच तो हिरावून घेतो. त्यामुळे न्या. चंद्रचूड यांनी हा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिला होता.
गोपनीयता अधिकारः वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनाच्या अधिकार हा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे गोपनीयता अधिकाराला मुलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली.
'मतभेद हे चमकदार लोकशाहीचे वैशिष्ट्यच': एका महत्त्वपूर्ण निकालात न्या. चंद्रचूड यांनी म्हटले की असंतोष हे जिवंत लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या मुद्यावर निषेधार्थ आवाज उठवला तर तो दडपता येणार नाही.
सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशः न्यायमुर्ती चंद्रचूड यांनी केरळमधील सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाला मान्यता दिली होती.
गर्भपात कायदा व वैवाहिक बलात्कारः २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याचा पूर्ण अधिकार विवाहित किंवा अविवाहित महिलेला आहे, असा निर्णय न्या. चंद्रचूड यांनी दिला आहे.