Rashmi Mane
पुण्याचे रहिवासी असलेले आसाम केडरचे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी वैभव निंबाळकर.
निंबाळकर हे मूळ पुणे जिल्ह्यातील् इंदापूर तालुक्यामधील सणसर या गावचे रहिवासी आहेत.
पदवीच्या पहिल्या वर्षापासून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. वैभव यांनी 2009 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले.
भारतीय पोलीस सेवेत अर्थात IPS प्रवेश मिळाला आणि आसाम हे केडर मिळालं. त्याआधी ऑगस्टमध्ये मसुरीला त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं.
वैभव निंबाळकर हे २००९ पासून 'आयपीएस' अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
भारतीय पोलिस सेवेत निवड झालेले ते सर्वांत तरुण अधिकारी आहेत. आसाम केडर प्राप्त झाल्यापासून ते आसाममध्ये कार्यरत आहेत.
जुलै 2021 मध्ये आसाम-मिझोरम सीमावादातून, दोन राज्यामध्ये अकस्मातपणे उसळलेल्या दंगली दरम्यान निंबाळकर यांना गोळी लागली. यात ते गंभीररित्या जखमी झाले होते.
उपचारातून बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा ते सेवेत रुजू झाले आहेत.
निंबाळकर आसाम पोलीस दलात पोलीस महानिरीक्षकपदी "डिआयजी' म्हणून कार्यरत आहेत.