सरकारनामा ब्यूरो
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 'मद्य धोरण' घोटाळाप्रकरणी संबंधित ईडीने अटक केली आहे.
केजरीवाल सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्ली येथे 'मद्य धोरण' अमलात आणले होते.
महसूल वाढवणे, माफियांचा प्रभाव कमी करणे, ग्राहकांची सोय आणि मद्याचा काळा बाजार रोखणे हे धोरणाचे मुख्य उद्दिष्ट होते.
या धोरणामुळे मद्याची सरकारी दुकाने बंद होऊन सरकारकडून खासगी परवाने जारी करण्यात आली.
मद्य पिण्याचे किमान वय 25 वरून 21 वर आणण्यात आले. यामुळे मद्यपान करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली.
महसुलात 27 टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामुळे हे महसूल 8900 कोटींवर गेले.
या धोरणामुळे मालकांना मद्याचा दर ठरवण्याची मुभा मिळाल्याने हव्या त्या किमतीत विक्री वाढली.
MRP वर सूट तसेच सर्व दुकानं पहाटे तीन वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली.
'एकावर एक बाटली फ्री' या स्किमद्वारे होम डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करून दिला तसेच मद्यविक्रेत्यांकडून ग्राहकांना वस्तूच्या किमतीतही सूट देण्यात आली.
R