Mangesh Mahale
नेत्यानं आपला वाढदिवस कसा साजरा करावा,याचे अनुकरणीय उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले.
युवा कार्यकर्ते असताना ते आपला वाढदिवस एखाद्या मंदिरात कार्यकर्त्यांसह साजरा करायचे. एकत्र येऊन सर्वांनी मिळून आरती करायचे.
मंदिरात आरती झाल्यानंतर चहा-सामोसे खाऊन घरी परत जायचे,अशी साधी सर्वसमावेश पद्धत त्यांची होती.
उदयोन्मुख तरुण नेता म्हणून फडणवीसांनी राजकारणात रुजलेली चमचा संस्कृती नेहमीच नाकारली.
राजकीय वाटचालीच्या मार्गात अनेक संकटे आली. त्याला ते सामोरे गेले.
गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. तेव्हा पक्षात विलक्षण पोकळी निर्माण झाली. ही परिस्थिती त्यांनी कौशल्यानं हाताळली.
फडणवीस यांच्या वडिलांचे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने निधन झाले. ही दु:खाची सल त्यांच्या मनात खोलवर होती.
यातूनच त्यांनी नागपूरात कॅन्सर उपचाराची अद्ययावत यंत्रणा उभारण्याचा निर्धार केला.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणीचा संकल्प त्यांनी पूर्ण केला.