सरकारनामा ब्यूरो
मुख्यमंंत्री आता नुसतं एकनाथ शिंदे नाही तर, आता डॉक्टर एकनाथ शिंदे म्हणून ओळखले जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून 'डी लिट' पदवी प्रदान करण्यात आली आहे.
सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना ही पदवी प्रदान करत असल्याचं विद्यापीठाच्या कुलपतींनी सांगितलं.
कोरोना काळात रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.
विद्यापीठाचे कुलगुरू,अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.
डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभा नेरुळच्या डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडला.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावापुढं डॉक्टर अशी उपाधी लागणार आहे.