सरकारनामा ब्यूरो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या राममंदिर प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव ठाण्यात साजरा केला.
अयोध्येतील सोहळ्याऐवजी त्यांनी ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिर सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला.
मंदिरातील भगवान शंकराच्या पिंडीची त्यांनी पूजा केली.
कोपिनेश्वर मंदिर हे ठाण्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.
अभिषेक सोहळ्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह ‘ढोल’ वाजवण्याचाही आनंद घेतला.
'जय श्रीराम' चा जयघोष करीत शेकडो रामभक्तांसह त्यांनी हा सोहळा साजरा केला.
शिवसेनेच्या वतीने तयार केलेली 100 फूट लांबीची अगरबत्ती त्यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली.
'दिवंगत हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले', अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना नेते उपस्थित होते.