सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबईमधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार.
महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार.
राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार.
कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.
इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार.
बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण.
राज्यात चार धर्मादाय सह आयुक्तपदांची निर्मिती करणार.
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय