Amol Sutar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभदिनी 'मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियाना'चा पुढचा टप्पा आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे पार पडला.
आयोजित महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी जिल्ह्यातील महिला भगिनींना विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान ही दोन कोटी महिलांचे जीवन बदलण्याची क्रांतिकारी योजना आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाने महाराष्ट्रातील साडेदहा हजार गावे आणि 295 शहरांमध्ये 1 लाख 65 हजार महिला बचत गट तयार केले असून, आज 20 लाख महिला सदस्य आहेत.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी या बचत गटांचे पॉवर ग्रुपमध्ये रूपांतर करून त्यांना प्रत्येक महापालिका क्षेत्रात त्यांच्या वस्तू विकण्यासाठी योग्य जागा दिली जाणार आहे.
औद्योगिक महामंडळ जास्तीत जास्त महिलांना त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग मार्केटिंग करण्यासाठी 35 टक्के अनुदान मिळवून देणार आहे.
या वेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने यांची उपस्थिती होती.
आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना न्याय देण्यासाठी शासन सकारात्मक असून, लवकरच त्यांच्या मानधनवाढीबाबत निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यातील 30 हजारांहून अधिक महिला या वेळी उपस्थित होत्या.
R