जयकुमार रावल यांची समिती करणार पद्म पुरस्कारासाठी शिफारस; कोण करु शकतात अर्ज?

Amit Ujagare

१) पद्म पुरस्कार २०२७साठी केंद्र सरकारकडं शिफारस करण्याकरता राज्य शासनानं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.

२) ही समिती पद्म पुरस्कारांसाठी विविध माध्यमातून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासनास करेल.

३) या समितीच्या स्थापनेसंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे.

४) त्याचबरोबर उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

५) विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची या नागरी सन्मानासाठी शिफारस केली जाते. अर्थात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीच यासाठी अर्ज करु शकतात.

६) अर्ज सादर करताना आपलं काम हे अपवादात्मक आणि वेगळे योगदान देणारं असल्याचं स्पष्टपणे दाखवावे. सामान्य कामगिरी पुरेशी नाही.

७) यासाठी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक आहे. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात नाहीत.

८) अधिक माहिती आणि फॉर्म भरण्याच्या सूचना https://awards.gov.in या केंद्र सकारच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत.